Maharashtra RTE Admission Required Documents: आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करिता बालकाचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र व जन्म तारखेचा पुरावा सर्व घटकातील बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक आहेत. वंचित घटक व इतर संवर्गातील आवश्यक कागदपत्रांची सूची पुढे या लेखात देण्यात आलेली आहे.
RTE Admission Required Documents | आरटीई ऑनलाईन प्रवेश आवश्यक कागदपत्रे यादी
महाराष्ट्र आरटीई प्रवेश कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत.
सर्व प्रवर्गातील बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे: RTE Admission Compulsory Documents
- बालकाचे आधार कार्ड (असल्यास)
- रहिवासी पुरावा (रेशन कार्ड / विजेचे बिल / राष्ट्रीय बँकेचे पालकांचे पासबुक, भाडेकरार व इतर.)
- जन्म तारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र)
आरटीई प्रवेश 2025-26 कागदपत्रे: वंचित / मागासवर्गीय संवर्गातील असल्यास कागदपत्रे (बालकांचे / पालकांचे)
- उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही. (एस सी/ एस टी)
- वडिलांचा जातीचा दाखला (तहसीलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल अधिकारी यांचे कडील प्रमाणित)
- महाराष्ट्र आर टी ई प्रवेश करिता परराज्यातील जात प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.
अपंग विधार्थ्याकरिता कागदपत्रे
- जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधिकारी / अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे कडील ४०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
एच.आय.वी बाधित / प्रभावित असल्यास
- जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधिकारी / अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र
कोविड प्रभावित बालक यांच्यासाठी कागदपत्रे
ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही ०१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे निधन झाल्यास त्यांना पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले पालकांचे मृत्यु प्रमाणपत्र
- कोविड १९ मुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
सदर मृत्यू कोविड १९ शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय / पालिका / महानगरपालिका / रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय / प्रयोगशाळा यांचे अहवाल असणे आवश्यक आहेत.
अनाथ बालके (वंचित घटक) आवश्यक कागदपत्रे
- अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील.
- जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र
- अनाथ बालकांच्या बाबतील इतर कागदपत्रे जसे उत्पन्नाचा दाखला ई. चा विचार घेण्यात येऊ नये.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास
- आर्थिक वर्ष २०२१-२२ / २०२२-२३ अखेरचे ०१ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला उत्पनाचा दाखला.
घटस्पोटीत महिला पालक आवश्यक कागदपत्रे
- न्यायालयाचा निर्णय
- घटस्पोटीत महिलेचा / बालकाच्या आई चा रहिवासी पुरावा.
- बालक वंचित असल्यास बालकाचे किंवा त्याचा वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र.
- बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास आईचा उत्पन्नाचा दाखला.
- न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्पोटाप्रकरणातील महिलाकरिता घटस्पोटाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचे पुरावे.
विधवा महिला करिता कागदपत्रे
- पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा
- वडिलांचे किंवा बालकाचे जात प्रमाणपत्र
- बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास आईचा उत्पन्नाचा दाखला
जन्मतारखेचा पुरावा करिता कागदपत्रे
- ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका यांचा प्रमाणित जन्म दाखला किंवा
- रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला किंवा
- अंगणवाडी / बालवाडी रजिस्टर मधील दाखला किंवा
- आई / वडील अथवा पालक यांनी प्रतिज्ञापत्र द्वारे केलेले स्वयं निवेदन
राहिवासी / वास्तव्याचा पुरावा करिता कागदपत्रे (खालीलपैकी कोणतेही एक)
- रेशनिंग कार्ड (शिधापत्रक)
- पालकांचे वाहन चालविण्याचे परवाना
- वीज बिल / टेलिफोन बिल
- पाणी पट्टी (पाणी कर पावती)
- मालमत्ता कर देयक (Property Tax ) / घरपट्टी
- फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- पालकांचे आधार कार्ड
- पालकांचे मतदान कार्ड
- पालकांचे पासपोर्ट
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे वरीलपैकी कोणतेही पुरावा म्हणून कागदपत्रे नसल्यास भाडेकरार (Rent Agreement)
- भाडेकरार हा अर्ज भरण्याच्या दिनांकापुर्वीचा असावा
- भाडेकाराराचा कालवधी ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्तचा असावा.
- भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा.
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : महत्वाच्या लिंक
माहिती | लिंक |
---|---|
आर टी ई प्रवेश २०२५ वयोमर्यादा पहा | RTE Age Calculator |
आर टी ई प्रवेश २०२५-२६ वेळापत्रक | येथे पहा |
आर टी ई प्रवेश ऑनलाईन अर्ज | Apply Online |
आर टी ई प्रवेश २०२५-२६ अर्ज भरण्याच्या सूचना | येथे पहा |
आर टी ई प्रवेश अधिकृत संकेतस्थळ | येथे पहा |
आर टी ई प्रवेश २०२४ एकूण अर्ज संख्या | येथे पहा |
आरटीई आवश्यक कागदपत्रे pdf | येथे पहा |
FAQ
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मध्ये बालकाचे आधार कार्ड नसल्यास काय करावे?
आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता बालकाचे आधार कार्ड असणे अनिवार्य नाही परंतु जर आपला प्रवेश निश्चित झाल्यास अशा वेळी आपण ९० दिवसाच्या मुदतीच्या आत आधार कार्ड शाळेत जमा करावे. असे न केल्यास शाळा आपला आरटीई २५% मधील प्रवेश रद्द करू शकते.
आरटीई ऑनलाईन प्रवेश करताना बालकाचा जन्म दाखला नसल्यास काय करावे?
आरटीई ऑनलाईन प्रवेश करताना बालकाचा जन्म दाखला नसल्यास आपण आई किंवा वडिलांचे स्वयं घोषणा पत्र देऊ शकता. त्यात बालकाच्या जन्मतारखेचा स्पष्ट उल्लेख करावा.
(Image Credit: RTE Admission Maharashtra Government Portal)