Maharashtra RTE Admission 2024-25

Maharashtra RTE Admission 2024-25: Apply Online, Latest Alerts महाराष्ट्र आरटीई प्रवेश | Schedule, Age Limit | [student.maharashtra.gov.in]

Maharashtra RTE Admission 2024-25: महाराष्ट्र आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ ऑनलाईन अर्ज १७ मे २०२४ पासून पुन्हा सुरु करण्यात आलेली आहे. यापूर्वी सन २०२४-२५ या वर्षाकरिता आरटीई २५ % प्रवेश प्रक्रिया करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते तथापि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया स्थगित करण्यात आलेली होती. तरी पालकांनी पुन्हा नव्याने अर्ज भरण्यास सुरुवात करावी अशी सूचना शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

आपण या लेखामध्ये महाराष्ट्र आरटीई प्रवेश २०२४-२५ करिता माहिती, वेळापत्रक, लॉटरी निवड पद्धत, ऑनलाईन अर्ज व त्या संबंधित सूचना यांची माहिती देणार आहोत.

Maharashtra RTE Admission 2024-25: पालकांसाठी सूचना

  • आरटीई प्रवेश प्रक्रिया सन २०२४-२५ या करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे.
  • सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • यापूर्वी ऑनलाईन पदधतीने केलेल्या अर्जाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ % प्रवेश प्रक्रियेसाठी केला जाणार नाही याची पालकांनी नोंद घ्यावी.

महाराष्ट्र आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ मध्ये पुढील प्रमाणे राबविण्यात येईल. आपण प्रत्येक प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती या लेखात देणार आहोत. महाराष्ट्र आर टी ई प्रवेश मध्ये पुढील प्रमाणे टप्पे असतात.

आर टी ई प्रवेश ऑनलाईन अर्ज भरणे:

या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी आपला आर टी ई प्रवेश ऑनलाईन अर्ज शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर भरू शकतात व त्याबाबत सूचना प्रसारित करण्यातआलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक पुढे या लेखात देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी आपण सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात नंतरच ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करावी.

RTE News: RTE Admission 2024-25 School News: शासकीय शाळा नसेल तर खासगी शाळांना प्राधान्य देण्याचा निर्णय..!

आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज पात्रता

  • आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करण्याआधी प्रथम आपल्या पाल्याचे वय किती आहे व प्रवेश घेण्यास पात्र आहे का हे पाहावे.
  • आपल्या पाल्याचे वय मोजण्याकरिता आरटीई प्रवेश २०२४-२५ वय गणकयंत्र चा वापर करावा.
  • आपल्या हव्या असलेल्या शाळेचे व आपल्या रहिवास स्थानाचे अंतर किती आहे हे जाणून घ्यावे.
  • तसेच आपल्या जवळील शाळेचे नाव आर टी ई २५ % प्रवेश यादीत आहे किंवा नाही हे निश्चित करावे.
  • आपल्या जवळ प्रवेश करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत किंवा नाहीत हे पाहावे.
  • सर्व बाबींची पूर्तता पूर्ण झाल्यास आपण ऑनलाईन अर्ज भरावा.

Latest Alerts: RTE Admission Vacancy 2024 Maharashtra: 43000 ऑनलाईन अर्ज संख्या | महाराष्ट्र आरटीई प्रवेश | पुणे जिल्हा अव्वल 12000+ अर्ज दाखल

महाराष्ट्र आरटीई वयोमर्यादा : RTE Admission Age Limit

महाराष्ट्र आरटीई वयोमर्यादा ही १ ली करीत ०६ वर्षे ते ०७ वर्षे ०५ महिने व ३० दिवस अशी असून त्याकरिता जन्मतारखेची अट ०१ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ आहे. सविस्तर आरटीई प्रवेश वयोमर्यादा पाहण्याकरिता आपण पुढील लेख वाचू शकता.

RTE Admission Age Limit Maharashtra: Age Calculator for 1st STD, Jr Kg, Sr Kg, Play Group 2024-25

Maharashtra RTE Admission 2024-25
Maharashtra RTE Admission 2024-25: Apply Online, Latest Alerts महाराष्ट्र आरटीई प्रवेश | Schedule, Age Limit | [student.maharashtra.gov.in] 4

RTE Admission 2024-25 Schedule: वेळापत्रक

महाराष्ट्र आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज दि. १७ मे २०२४ पासून सुरु करण्यात आले आहेत व त्या करीत शेवटची तारीख ०४ जून २०२४ (मुदतवाढ) ३१ मे २०२४ अशी आहे. महाराष्ट्र आरटीई प्रवेश सविस्तर वेळापत्रक पुढे देण्यात आले आहे. तसेच वेळापत्रक के महाराष्ट्र शासन, शिक्षण विभागाच्या अधीकृत संकेतस्थळावरून घेण्यात आलेले आहे व त्यात काही बदल झाल्यास ह्या लेखात कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Maharashtra RTE Admission Schedule 2024: महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2024-25 वेळापत्रक – Updated RTE Schedule

महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2024-25 लॉटरी पद्धतीने प्रथम निवड व प्रतीक्षा यादी : rte admission selection process

  • विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड यादी व त्याच बरोबर प्रतीक्षा यादी देखील प्रसिद्ध करण्यात येईल.
  • प्रवेश घेण्याकरिता अधिसूचना वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळ व या ठिकाणी प्रकाशित करण्यात येतील.
  • आर टी ई २५% प्रवेश करिता विद्यार्थी निवड ही लॉटरी पद्धतीने होते.
  • लॉटरी पद्धतीमध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी अश्या दोन याद्या जिल्हा निहाय प्रकाशित केल्या जातात व आपण प्रत्येक जिल्हा करिता निवड यादी पाहू शकता.

महाराष्ट्र आरटीई प्रवेश २०२४: निवड झालेल्या विधार्थ्यांचे शाळा प्रवेश प्रक्रिया

  • आर टी ई २५% प्रवेश करिता निवड झाल्यानंतर निवड झालेल्या विधार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरु होते.
  • विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी व शालेय प्रवेश अश्या ०२ टप्प्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावा लागतो तसेच त्याकरिता ठराविक कालावधी देण्यात येतो.
  • जे विद्यार्थी निवड झाल्यानंतर प्रवेश घेण्यात अपयशी किंवा अपात्र होतात त्यांचा जागी पुढील प्रवेश फेरीत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येते.
  • अश्या प्रकारे अंतिम निवड व प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
  • त्या करिता अधिसूचना शालेय शिक्षण विभागाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.

RTE Admission 2024 Apply Online: महत्वाच्या लिंक्स

आर टी ई प्रवेश २०२४-२५ वयोमर्यादा पहाRTE Age Calculator
आर टी ई प्रवेश २०२४-२५ वेळापत्रक येथे पहा
आर टी ई प्रवेश ऑनलाईन अर्जApply Online
आर टी ई प्रवेश २०२४-२५ अर्ज भरण्याच्या सूचनायेथे पहा
आर टी ई प्रवेश अधिकृत संकेतस्थळयेथे पहा
आर टी ई प्रवेश २०२४ एकूण अर्ज संख्या येथे पहा
आरटीई प्रवेश २०२४ प्रवेश नियम व पालकांसाठी सूचनायेथे पहा

RTE Admission 2024: Related News and Links

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top