RTE Admission Maharashtra 2024 PIL: जनहित याचिका दाखल..! आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ मधील नवीन नियमांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान…!

RTE Admission Maharashtra 2024 PIL: महाराष्ट्र सरकार शिक्षण विभागाच्या आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ मधील नवीन नियमांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ मध्ये नियमात बदल करण्यात आल्यामुळे खासगी इंग्लिश मेडियम शाळेत  प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांना प्रवेशासाठी फटका बसणार असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

RTE Admission Maharashtra 2024 PIL Againts New Rule

  • त्याकरिता ज्येष्ठ वकील ॲड. जयना कोठारी, ॲड. दीपक चटप, ॲड. पायल गायकवाड, ॲड. ऋषिकेश भोयर अश्या वकिलांच्या माध्यमातून शिक्षण हक्क व नियम यामध्ये काम करणाऱ्या संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
  • नव्या आरटीई नियमांना आव्हान देण्यात आले असून त्यामुळे महाराष्ट्र शिक्षण विभागाला लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे दिले आहेत.

त्यानंतर उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला नोटीस बजावली आहे व आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ मधील नवीन नियमांबाबत ८ मे २०२४ पर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

आरटीई प्रवेश २०२४-२५ नवीन नियम

  • आरटीई प्रवेश २०२४-२५ अंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात.
  • शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
  • त्यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर पर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे.
  • यातील उपलब्ध शाळा नसल्यास स्वयं अर्थसहाय्यित खासगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.

अशा या नवीन नियमांमुळे पालकांमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यात कमी प्रतिसाद मिळत आहे. या नियमांची अंमलबजावणी झाली तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून नव्या नियमांमुळे श्रीमंतांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी तयार होत आहे.

महाराष्ट्र राज्य आरटीई प्रवेश २०२४-२५ अर्जाची स्थिती: RTE Admission Online Application Status

महाराष्ट्र आरटीई प्रवेश नवीन नियम अन्यायकारकच.!

  • राज्य सरकारचे नवे नियम बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचे मत याचिका कर्त्यांचे वकील ॲड. दीपक चटप यांनी मांडले.
  • “आरटीई प्रवेश २०२४-२५ मधील नियम बदलांमुळे बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या विनाअनुदानित खासगी शाळेत प्रवेश मिळणार नसल्याने गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागेल “ असे मत याचिकाकर्ते व शिक्षण हक्क कार्यकर्ते वैभव एडके, राहुल शेंडे, वैभव कांबळे, अनिकेत कुत्तरमारे यांनी व्यक्त केले आहे.
  • तसेच हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तरप्रदेश इत्यादी राज्यांत खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास मुभा असलेले नियम तेथील राज्य सरकारने तयार केले. मात्र त्या पद्धतीचे असे नियम हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहे.
  • २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांना मुभा देता येत नाही. खासगी शाळांना वेळेत परतावा दिल्यास त्यांचा देखील विरोध होणार नाही.

या मध्ये निष्कर्ष असा घेऊ शकतो कि, नवीन नियमांत बदल झाल्यास किंवा जसे मागील वर्षी आरटीई प्रवेश नियम लागू होते तसे पुन्हा झाल्यास गरीब व वंचित गटातील पालकांना आपल्या पाल्यासाठी इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये प्रवेश घेण्यास सोयीचे होईल तसेच आरटीई २५% प्रवेश खाजगी संस्थेतील रिक्त जागा ह्या त्यांना मिळतील.

(News Source: Loksatta ePaper)

RTE Admission Maharashtra 2024 PIL Loksatta News
RTE Admission Maharashtra 2024 PIL: जनहित याचिका दाखल..! आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ मधील नवीन नियमांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान...! 2

RTE Admission 2024 Read More

महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2024लिंक
आर टी ई प्रवेश २०२४-२५ वयोमर्यादा पहाRTE Age Calculator
आर टी ई प्रवेश २०२४-२५ वेळापत्रकयेथे पहा
आर टी ई प्रवेश ऑनलाईन अर्जApply Online
आर टी ई प्रवेश २०२४-२५ अर्ज भरण्याच्या सूचनायेथे पहा
आर टी ई प्रवेश अधिकृत संकेतस्थळयेथे पहा
आर टी ई प्रवेश २०२४ एकूण अर्ज संख्यायेथे पहा
आरटीई प्रवेश २०२४ प्रवेश नियम व पालकांसाठी सूचनायेथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top