RTE Admission 2024-25 School News: शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (RTE) २५ % राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया करिता विद्यार्थ्याच्या पत्त्यापासून एक किलोमीटर अंतरावर शासकीय, अनुदानित किंवा स्थानिक स्वराज संस्था यांच्या शाळा नसतील तर स्वयं अर्थ सहाय्यित शाळा असतील तर अशा परिस्थितीत त्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळणार आहे. असा नियम आरटीई प्रवेश 2024-25 बाबत करण्यात आलेला आहे व त्या करिता प्राथमिक शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
RTE Admission 2024-25 School News
शिक्षक हक्क कायद्याअंतर्गत आरटीई 25 टक्के प्रवेश 2024 करिता राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम ठरविला आहे. आता संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या शाळेत मुलांना प्रवेश मिळणार आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या रहिवासी निवास स्थानापासून ०१ किलोमीटर अंतरावरील अनुदानित शाळा, शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा (जिल्हा परिषद /नगरपालिका / महानगर पालिका) आणि स्वयं अर्थ सहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा उपलब्ध असणार आहेत. त्यानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. असे वक्तव्य शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी दिलेलं आहे.
आरटीई प्रवेश 2024-25 आवश्यक कागदपत्रे
- निवासी पुरावा
- भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांसाठी भाडेकरार
- जन्मतारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- छायाचित्र
आरटीई 25 % प्रवेश 2024 सूचना
- त्यानुसार वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25 % राखीव जागांअंतर्गत महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, कॅन्टोमेंट बोर्ड, जिल्हा परिषद (प्राथमिक), महापालिका (स्वयंअर्थसहाय्यित), जिल्हा परिषद (माजी शासकीय), खासगी अनुदानित (अंशतः अनुदानित वगळून) आणि स्वयं अर्थ सहाय्यित शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे.
- यात, अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवास स्थानापासून एक किलो मीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि स्वयं अर्थ सहाय्यित शाळा नसेल, तर विद्यार्थ्यांच्या निवास स्थानापासून तीन किलो मीटर पर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश देण्यास प्राधान्य दिले जाईल, असे शिक्षण विभागाने नमूद केले आहे.
आरटीई 25 % प्रवेश महाराष्ट्र करिता पालकांसाठी महत्वाची सूचना
- पालकांना अनुदानित शाळांऐवजी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची निवड करता येणार
- यापूर्वी आरटीईअंतर्गत प्रवेश घेतला असल्यास त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही
- अर्ज भरताना चुकीची माहिती भरून प्रवेश घेतल्यास प्रवेश रद्द होईल
- पालकांनी आरटीई पोर्टलवरील माहितीवर लक्ष ठेवावे
आरटीई 25 प्रवेश 2024 शाळा प्राधान्य क्रम असा असेल
- अनुदानित शाळा
- शासकीय शाळा/स्थानिक
- स्वराज्य संस्थांच्या शाळा
- स्वंयअर्थसहाय्यित शाळा
FAQ
What is School Distance for RTE Admission 2024?
School Distance for RTE Admission from Student residence address is Up to 01 Km, 01 Km to 03 Km, and 03 Km above. This School distance range is given in the RTE Admission 2024 Brochure and Giudelines.
RTE Admission Lates News:
- RTE Admission 2024 News: आरटीई 25% प्रवेश शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या जागा कमी होणार
- Maharashtra RTE Admission Schedule 2024: महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2024-25 वेळापत्रक – Updated RTE Schedule
- RTE Admission Age Limit Maharashtra: Age Calculator for 1st STD, Jr Kg, Sr Kg, Play Group 2024-25
News Credit: Sakal ePaper & Image Credit: pxhere.com
Pingback: RTE Admission Vacancy: एकूण ऑनलाईन अर्ज 21 हजारहून अधिक - RTE Admission 2024-25