RTE Admission 2024 News: आरटीई 25% प्रवेश शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या जागा कमी होणार

RTE Admission 2024 News: अनुदानित व सरकारी शाळा खाजगी शाळेच्या जवळ असल्यास खाजगी शाळेतील राखीव जागांवर प्रवेश नाही मिळणार असा शासन राजपत्रात जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे नक्कीच अश्या शाळेच्या जागा कमी होणार..!

अनुदानित शाळा ०१ किलोमीटर जवळ असल्यास खासगी शाळेतील राखीव जागांवर प्रवेश नाही

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा (आरटीई) नुसार सामाजिक, आर्थिक दृष्ट्या वंचित व दुर्बल घटक यांच्यासाठी राखीव असलेल्या खासगी शाळांतील २५ टक्के प्रवेशाबाबत शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेण्यात आलाय.

आरटीईची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२४-२५: नवीन नियम

  • खासगी शाळेच्या एक किलोमीटर परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा येत असेल अशा शाळांमधील २५ टक्के जागांवर २५% प्रवेश केले जाणार नाहीत. तसेच अश्या शाळा आर टी ई अंतर्गत या प्रवेशांसाठी अपात्र असतील.
  • महाराष्ट्र अधिनियम, बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क नियम, २०२४ मध्ये हे बदल करण्यात आले आहेत व हे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत.
  • त्यामुळे अनेक खासगी शाळा २५ टक्के आर टी ई अंतर्गत प्रवेशाकरिता ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत त्यामुळे प्रवेशासाठी च्या जागांची संख्या कमी होणार आहे.
  • तसेच पालकांना आपल्या घरा जवळील सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक राहील.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून हे बदल व नियम लागू होणार असल्यामुळे अद्यापही आरटीई ची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही.

या निर्णयामुळे २५ टक्के प्रवेशांसाठी सरकारवर येणारा खासगी शाळांवरील शुल्काचा भारही कमी होणार आहे.

सरकारी शाळा जवळ असतानाही प्रवेश झाल्यास ती खासगी विना अनुदानित शाळा कलम बाराच्या उपकलम दोननुसार प्रतिपूर्ती करता पात्र ठरणार नाही.

rte admission 2024 news | महाराष्ट्र आरटीई 25% प्रवेश करिता एकूण जागा :

  • महाराष्ट्र राज्यात सुमारे ४० हजार खासगी शाळा २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी पात्र ठरतात.
  • या शाळांमधील सुमारे लाखभर जागांकरिता प्रवेश होतात. गेल्या वर्षी यातील ८२ हजार जागांवर प्रवेश झाले होते.
  • या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता वर्षाला १७,६७० रुपये इतकी रकमेची पूर्तता सरकार शाळांना करते.
  • मात्र  काही वर्षापासून ही रक्कम थकीत असल्याने तब्बल २४०० कोटींवर गेली असून सरकारवर त्याचा बोजा पडत आहे.

संदर्भाकरिता आपण पुढील बातम्या हि वाचू शकतात.

rte admission 2024 news lokmat 16 feb 2024
RTE Admission 2024 News: आरटीई 25% प्रवेश शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या जागा कमी होणार 2

(Source: Lokmat News | Loksatta News) (Image Credit: wikimedia.org)

महाराष्ट्र आर टी ई प्रवेश २०२४-२५ माहिती करिता rteadmission.com ला भेट द्या.

1 thought on “RTE Admission 2024 News: आरटीई 25% प्रवेश शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या जागा कमी होणार”

  1. Pingback: RTE Admission 2024-25 School News: शासकीय शाळा नसेल तर खासगी शाळांना प्राधान्य देण्याचा निर्णय..! - RTE Admission 2024-25

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top