RTE Admission Instructions for parents: बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांसाठी सूचना आर टी ई ऑनलाईन संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्ष पालकांना दिनांक १६ एप्रिल २०२४ पासून लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. student.maharashtra.gov.in या लिंकवर पालकांना आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी नोंदणी करता येईल.
RTE Admission Instructions: RTE प्रवेश नियम मराठी
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सन २०२४-२५ प्रवेश नियम व पालकांसाठी सूचना (RTE Admission Instructions for parents) पुढील प्रमाणे आहेत.
अवैध पुरावा व कागदपत्रे बाबत सूचना
शाळा खालील कारणांमुळे आरटीई २५ टक्के प्रवेश नाकारु शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी व याबाबतची माहिती पोर्टलवर उपलब्ध असावी.
- अवैध निवासाचा पत्ता
- अवैध जन्मतारखेचा दाखला
- अवैध जातीचे प्रमाणपत्र
- अवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- अवैध फोटो आयडी
- अवैध दिव्यांग प्रमाणपत्र
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश: पालकांकरिता सर्वसाधारण सुचना
- ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
- प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल.
- तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरु नयेत.
- अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी.
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश: भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता सूचना
- भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा.
- भाडेकरार हा अर्ज भरण्याच्या दिनांकाचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा.
- जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्पयावर पडताळणी करण्यात येईल.
- ज्या ठिकाणचा भाडेकरार दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्यापालकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल.
- तसेच प्रवेश आरटीई मधून झाला तरी ही संबधित पालकांनी संपूर्ण फी भरावी लागेल.
आरटीई २५ टक्के प्रवेश: विध्यार्थी व शाळेतील अंतर याबाबत सूचना
- विदयार्थ्यांना निवासस्थानापासून १ किलोमिटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील, वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे.
- तथापि एखादया पालकांनी प्रथम प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्रथम प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा निवडता येईल.
- विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमिटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा किंवा शासकीय शाळा नसतील व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना २५ टक्के अंतर्गत सोडत पदधतीने प्रवेश दिला जाईल.
- अपवादात्मक परिस्थितीत विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा नसेल तर विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्याने होतील.
संदर्भ : महाराष्ट्र शासनाचे पत्र क्र. आरटीई – २०१९ / प्र. क्र. २५ / एस डी – १ दि. १३/०२/२०२४, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य अधिसूचना दि. ०९/०२/२०२४
Related Alerts for Maharashtra RTE 25 Admission 2024
- RTE Admission Vacancy 2024 Maharashtra: आरटीई ऑनलाइन प्रवेश पुणे जिल्हा शनिवारी सायंकाळपर्यंत 6000+ अर्ज दाखल तर राज्यातील एकूण अर्ज संख्या 21 हजारहून अधिक.
- RTE Admission 2024-25 School News: शासकीय शाळा नसेल तर खासगी शाळांना प्राधान्य देण्याचा निर्णय..!
- RTE Admission 2024 News: आरटीई 25% प्रवेश शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या जागा कमी होणार
Important Links for RTE Admission 2024-25
आर टी ई प्रवेश २०२४-२५ वयोमर्यादा पहा | RTE Age Calculator |
आर टी ई प्रवेश २०२४-२५ वेळापत्रक | येथे पहा |
आर टी ई प्रवेश ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |
आर टी ई प्रवेश २०२४-२५ प्रवेश नियम व पालकांसाठी सूचना | येथे पहा |
आर टी ई प्रवेश अधिकृत संकेतस्थळ | येथे पहा |
आर टी ई प्रवेश २०२४ एकूण अर्ज संख्या | येथे पहा |