RTE Admission Latest News: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळांना वगळण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात स्थगिती देण्यात देण्यात आली आहे. महाराष्ट्र आर टी ई प्रवेश २०२४-२५ करिता सुधारित परिपत्रक काढण्यात येईल, अशी ग्वाही राज्य शासनाने मंगळवारी उच्च न्यायालयात असल्यामुळे संपूर्ण नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवण्याची वेळ शिक्षण विभागावर येणार आहे.
RTE Admission Latest News: महाराष्ट्र आर टी ई प्रवेश २०२४-२५ ला न्यायालयीन स्थगिती..!
- खासगी विनाअनुदानित शाळा, स्वयं अर्थ सहाय्यित महापालिका शाळा व विनाअनुदानित पोलीस कल्याण शाळांमध्येही २५% जागा वंचित घटकांसाठी राखीव ठेवल्या जातील.
- याचे स्पष्ठीकरण देताना सांगितले कि, “कोणताही नियम किंवा बदल हा मूळ कायद्याच्या अधीन असणेच अनिवार्य आहे”.
- त्यामुळे आरटीई अंतर्गत राखीव आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरील प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळा वगळण्याच्या निर्णयाला न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती देण्यात आली.
Maharashtra RTE Admission New Rules: नवीन परिपत्रक येणार..!
- तसेच या पार्श्वभूमीवर सुधारित प्रवेश परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाला दिली.
- तसेच अश्विनी कांबळे यांच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने आरटीई मधील दुरुस्तीला व नवीन नियमावलीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यास स्थगिती देण्यात आली आहे.
मात्र न्यायालयाचा निर्णय आणि सरकारने मंगळवारी न्यायालयात दिलेल्या माहितीनंतर आता प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार असून त्यानुसार शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कार्यवाही करेल अशी अपेक्षा आहे.
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : महत्वाच्या लिंक
Maharashtra RTE Admission News | Links |
---|---|
आर टी ई प्रवेश २०२४-२५ वयोमर्यादा पहा | RTE Age Calculator |
आर टी ई प्रवेश २०२४-२५ अर्ज भरण्याच्या सूचना | येथे पहा |
आर टी ई प्रवेश अधिकृत संकेतस्थळ | येथे पहा |
आर टी ई प्रवेश २०२४ एकूण अर्ज संख्या | येथे पहा |
आरटीई आवश्यक कागदपत्रे pdf | येथे पहा |
FAQ
महाराष्ट्र आरटीई प्रवेश २०२४-२५ ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख काय आहे?
न्यायालयीन स्थगिती मुळे आणि महाराष्ट्र सरकारने मंगळवारी न्यायालयात दिलेल्या माहिती नंतर आता प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार असल्याचे स्पष्ट होतेय. त्यामुळे सुधारित वेळापत्रक पुन्हा प्रकाशित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
(Image / News Source: Loksatta ePaper)